CMO Maharashtra
24.4L Subscribers |
Last Updated on November 19, 2024 |
Published on : November 19, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राने थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल क्रमांक टिकवून ठेवला आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाने एक नवा विक्रम नोंदवला आहे.
शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना, विकासप्रकल्पांची अचूक आणि वस्तुनिष्ठ माहिती, जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र’ यांनी अधिकृत, प्रमाणित व्हॉटस ॲप चॅनल सुरु केले आहे.
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या शासकीय कार्यक्रमांपासून मंत्रिमंडळाच्या आणि महत्त्वाच्या निर्णयांची अधिकृत माहिती आता एका क्लिकवर मिळवता येणार आहे.
तेव्हा फॉलो करा आणि अपडेट मिळवा….
- मा. मुख्यमंत्री सचिवालय,
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
www.maharashtra.gov.in